राष्ट्रीयविशेष

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पिंपरखेडला भेट. बिबटयाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या रोहन बोंबेच्या कुटुंबीयांची घेतली भेट

शिरूर  {डेली न्यूज पोस्ट टीम -24}: पिंपरखेड परिसर बिबट मुक्त होण्यासाठी शासन उपाययोजना करेल असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या रोहन बोबे याच्या कुटुंबियाची भेट घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांत्वन केले.यावेळी त्याच्या समवेत आमदार शरद सोनवणे, माजी आमदार पोपटराव गावडे, देवदत्त निकम , वनखात्याच्या अधिकारी स्मिता राजहंस, तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे आदी उपस्थित होते .

शिंदे म्हणाले की ग्रामस्थांनी सांगितल की पूर्वी रात्रीचे दिसणारे बिबटे आता दिवसाही दिसू लागले आहेत. त्यामुळे हा सर्व परिसर बिबट् मुक्त करण्याची मागणी केली जात आहे. दिवसा ढवळ्या बिबटे हल्ले करीत आहेत. कुटूंबा समोर आपल्या माणसाची शिकार होवू लागली आहे. या कुटुंबियानी जगायचं कस हा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला आहे. त्यामुळे या विषया बाबत मुख्यमंत्री सह केंद्र शासनाशी चर्चा करण्यात येईल.
यापुढे कोणाच्या मृत्यू होवू नये व हा परिसर बिबट् मुक्त झाला पाहिजे तो कसा करायचा याबाबत शासन उपाय योजना करेल. असे शिंदे म्हणाले.
भीतीने त्रस्त झालेल्या पिंपरखेड ग्रामस्थाची व बोबे कुटुंबियाची भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली.
यावेळी रोहन बोंबे यांच्या वडिलांनी मुलांच्या आठवणी ने हंबरठा फोडत आपल्या मुलगा अभ्यासात हुशार होता. व स्कॉलरशिप परीक्षेत चांगले मार्क पडल्याचे सांगितले. यावेळी महिला म्हणाल्या की काही करा पण आमचा परिसर बिबट्या मुक्त करा. आम्ही शेतीची कामे कशी करायची बिबटयाच्या दहशती ने मुलांनी शाळेत कस जायचं .
ग्रामस्थांनी मागणी केली की बिबटयाच्या संदर्भात झालेल्या आंदोलनात आंदोलकावरील दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत.

लोकनेते आदरणीय मा. आमदार बाबुरावजी पाचर्णे यांच्या जयंती निमित्त डेली न्यूज पोस्ट टीम 24 चा वतीने विनम्र अभिवादन

बिबटयाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की
बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबाच्या पाठीशी सरकार पूर्णपणे उभे राहिल. अश्या प्रकारच्या दुर्घटना घडू नये याची दक्षता घेण्यात येईल.
मागील १५ दिवसात शिरूर तालुक्यातील पिंपरखेड व जांबुत येथील रोहन बोबे, अनन्या बोबे या दोन चिमकुल्याचे व भागाबाई जाधव या ज्येष्ठ महिलेच्या बिबटयाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने या परिसरात तणावाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मातोश्री कलावती नवले यांना डेली न्यूज पोस्ट च्या वतीने भावपूर्ण आदरांजली

संतप्त ग्रामस्थानानी वनखात्याचा वाहनाची तोडफोड व जाळपोळ करत रासता रोको करून बिबटयाच्या बंदोबस्त करावा व नरभक्षक बिबटयाला ठार करावे अशी मागणी केली होती. त्यानंतर वनविभाग व प्रशासन ऍक्शन मोड वर येत वनविभागाने या नरभक्षक बिबटयास गोळ्या घालत ठार केले होते.
नरभक्षक बिबट्यास ठार केले तरी पिंपरखेड परिसरात बिबटयाची दहशत कायम आहे. काल { बुधवार -५ नोव्हे }रोजी या परिसरातील ऊसतोड महिला कामगारावर बिबट्या गुरगुरल्या तर भाऊसाहेब ठोँबरे यांचा घोडीवर हल्ला केला तर देऊबाई शिंदे यांच्या अंगणात बिबटयाने डर काळी फोडली.
त्याच बरोबर जाबूत येथे भागाबाई जाधव या ज्येष्ठ महिलेच्या बिबटयाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्या घटनास्थळा लगत लावलेल्या पिंजरात ही एक साडेतीन वर्षाची मादी जेरबंद झाली आहे. निमगाव म्हाळुंगी येथील रणदिवे वस्ती येथे बिबटयाने केलेल्या हल्ल्यात ४ शेळ्या मारल्या गेल्या. कान्हूर मेसाई येथील ढगेवाडी जवळ बिबटयाचा कळप वावरताना आढळून आला आहे.
सध्या शिरूर तालुका बिबटयाच्या भीतीच्या गडद सावटा खाली असून जन जीवन ही विस्कळीत झाले आहे.
आता पर्यत पिपरखेड व जांबुत या परिसरातील १२ बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत तर एका नरभक्ष बिबटयास ठार करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button