

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}समाजातील वंचित घटकांनाही दिवाळीचा आनंद अनुभवता यावा, या हेतूने स्व. यशवंतराव चव्हाण सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान आणि डंबेनाला गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने यंदाही ‘दिवाळी अनाथांसोबत’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पार पडणाऱ्या या उपक्रमास यंदाही समाजातील विविध घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


“दुर्बल घटकांनाही आनंदाचा प्रकाश लाभावा, हाच या उपक्रमाचा हेतू आहे,” असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बारवकर यांनी सांगितले.
ढोरमले यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला, तर विनय संकपाळ यांनी आभार मानले.


