Uncategorizedविशेषशैक्षणिक
वाढदिवसा निमित्ताच्या सेलिब्रेशनच्या खर्चाला फाटा देत भारतीय स्टेट बँकेचे नोडल अधिकारी निखिल अजित डोंगरे यांची नगर परिषद शाळा क्रमांक सहा ला साऊंड सिस्टिम भेट
-

भारतीय स्टेट बँक नोडल अधिकारी निखिल अजितराव डोंगरे यांनी वाढदिवसानिमित्त शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक सहा यांना साऊंड सिस्टिम भेट दिली.
दरम्यान ही साऊंड सिस्टीम माजी नगरसेवक मंगेश खांडरे, एस. टी. महामंडळ मधील सेवानिवृत्त अधिकारी व निखिल डोंगरे यांचे वडील अजितराव डोंगरे, नोटरी रवींद्र खांडरे, पुणे जिल्हा भाजपा अल्पसंख्यांक सेलचे राजू भाई शेख, भाजपाचे पदाधिकारी मितेश गादिया, निलेश नवले व सामाजिक कार्यकर्ते दगडू सकट यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक संजय वाघ व शिक्षिका अनिता धुमाळ यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.



