Uncategorized

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्य सेनानी व शिरूर तालुक्याचे सुपुत्र हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या १३८व्या व्या जयंतीनिमित्त शिरूर मध्ये अभिवादन

Óúशिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्य सेनानी व शिरूर तालुक्याचे सुपुत्र हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या १३८व्या व्या जयंतीनिमित्त शिरूर शहरातील विविध शाळांमध्ये त्यांना अभिवादन करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. शिरूर तालुक्यातील तळेगाव येथील ते सुपुत्र असून, त्यांच्या जीवनकार्याचा ही त्यांनी आढावा शिरूर नगरपरिषद सेंटर शाळेचे { शाळा क्रमांक ६) मुख्याध्यापक संजय वाघ यांनी घेतला.

पिंगळे यांच्या जयंती निमित्ताने त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी मुख्याध्यापक विलास लोळगे,आदी उपस्थित होते. बालाजी विद्यालयात हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे जयंती  साजरी करण्यात आली.

oplus_131074

बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बालाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात थोर स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. विद्यालयातील शिक्षक काळुराम पाबळे यांनी हुतात्मा पिंगळे यांच्या देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची माहिती देत विद्यार्थ्यांना देश प्रेम त्याग व कर्तव्य भावनेचे महत्त्व समजावून सांगितले . या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक म्हसवडे, उपमुख्याध्यापिका स्वाती चत्तर, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व सामाजिक जाणीव वृद्धिंगत होते. मुख्याध्यापक विनायक म्हसवडे म्हणाले. बीकेसी स्कुल येथे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या प्रतिमेस सुनील चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

दरम्यान डेक्कन एज्युकेशन इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक डॉ. समीर ओंकार यांनी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या जयंती निमित्ताने शिरूर तहसील कार्यालय व शिरूर नगरपरिषद कार्यालयास पिंगळे यांची तसबीर भेट दिली. तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या कडे या तसबीर देण्यात आल्या.

दरम्यान डॉ. ओंकार यांनी सांगितले की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. शिरूर तालुक्यातील तळेगाव येथील हे सुपुत्र असून, त्यांच्या जीवनकार्याची व देशासाठी दिलेल्या बलिदानाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. यासाठी विविध शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. जयंतीच्या औचित्याने शिरूर शहरातील सर्व शाळांना पिंगळे यांचे छायाचित्र भेट देण्यात आले.

या अंतर्गत जीवन विकास मंदिर, ज्ञानगंगा विश्व विद्यालय, सीताबाई थिटे औषधनिर्माण महाविद्यालय, चांदमल ताराचंद बोरा कॉलेज, विद्याधाम प्रशाला, रसिकलाल माणिकचंद धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल, बी.के.सी. स्कूल , व्हिजन इंटरनॅशनल स्कूल, बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल, सेंट जोसेफ स्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, सूर्यकांत पलांडे ज्युनिअर कॉलेज, साधना इंटरनॅशनल स्कूल, रयत शाळा स्वामी विवेकानंद आश्रम शाळा व अन्य शाळा यांच्यासह शिरूर नगरपरिषद मराठी शाळा येथे पिंगळे यांची प्रतिमा भेट देण्यात आली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ होऊन क्रांतिकारकांच्या बलिदानाची जाणीव निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button