महाराष्ट्र

शिरूर येथे शनिवार३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त पुस्तक व ग्रंथप्रदर्शन

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम 24) :शिरूर नगरपरिषद आणि शिरूर रिक्रिएशन क्लब अँड लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनानिमित्त शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ग्रंथ व पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

सदर उपक्रमाचा उद्देश वाचनसंस्कृतीला चालना देणे, ज्ञानप्रसार करणे तसेच सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला अभिवादन करणे हा आहे.

प्रदर्शनाचे आयोजन घर क्र. १२३, महात्मा गांधी रोड, शिरूर नगरपालिकेच्या ग्रंथालय इमारतीत, रामआळी, शिरूर, जि. पुणे येथे करण्यात आले आहे.

या वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक, महिला व सर्व वयोगटातील वाचकांना पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात येतात..

या ग्रंथ व पुस्तक प्रदर्शनास विद्यार्थी व  नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button