शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}
शिरूर तहसीलदार कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी व महाजन मळा येथील ज्येष्ठ नागरिक बबनराव मारूती महाजन वय ८४ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी, बंधू, तीन मुले, २ विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. शिरूर तहसीलदार कार्यालयातील प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती. परिसरातील धार्मिक, सामाजिक कार्यात ही त्यांच्या सहभाग असायचा.
सोमनाथ महाजन,प्रताप महाजन,सुदाम महाजन व सुनंदा हैबतराव थिटे, सुमन रामदास धायबर यांचे ते वडील होत.
दशक्रिया विधी – शनिवार दिनांक ३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता भैरवनाथ मंदिराचा मागे घोडनदी किनारी रामलिंग शिरूर येथे