Uncategorizedराष्ट्रीय
शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम 24) :आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शाश्वत विकासाला गती देण्यासाठी नवोन्मेष, सहकार्य आणि उद्योजकतेचे महत्त्व अधोरेखित करणारा ‘IICES 2026 – Paving Way for Sustainable Growth’ हा राष्ट्रीय स्तरावरील एकदिवसीय परिसंवाद शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी शिरूर येथील
एस.एस.पी. मंडळाच्या चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात होणार आहे. हा परिसंवाद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन इन इनकुबेशन अँड लिंकजेस Centre for Innovation, Incubation & Linkages यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.
शाश्वत आर्थिक विकास, उद्योग–शिक्षण सहकार्य आणि उद्योजकतेतील संधी या विषयांवर ते आपले विचार मांडतील.
या निमित्ताने स्टार्टअप सेलच्या माध्यमातून सुमारे ३५ स्टॉल्स उभारण्यात येणार असून त्यामध्ये विविध नवकल्पना, संशोधन प्रकल्प, स्टार्टअप संकल्पना आणि नाविन्यपूर्ण उत्पादने सादर केली जाणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एमआयटी–एडीटी विद्यापीठ, विविध संशोधन संस्था आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग राहणार आहे.