Uncategorized
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिरूर शहरात ग्रंथ प्रदर्शन व अभिवादन सभा









सुनील चौधरी, अशोक भोसले, प्रीती बनसोडे, डॉ. वैशाली साखरे, राजू खेतमाळीस, किरण बनकर आदी उपस्थित होते.
त्यांनी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा केंजळे यांनी आपल्या भाषणातून घेतला.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. इयत्ता आठवीतील विद्यार्थी आरुष पाटील याने सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर भाषण सादर केले. डॉ. समीर ओंकार यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच आज देशाच्या राष्ट्रपतिपदी एक महिला आहे, देशाचे पंतप्रधान पद, अर्थमंत्री पद, संरक्षण मंत्री पद महिलांनी भूषविले आहे. ऑपरेशन सिन्दुर दरम्यान सैन्याधिकारी पदाची जबाबदारी ही महिलांकडे होती हे सारे श्रेय सावित्रीबाई फुले यांच्या समर्पित कार्याचे आहे
असे डॉ. ओंकार यांनी नमूद केले. या वेळी व्यासपीठावर शाळेच्या शिक्षक प्रतिनिधी सौ. जयश्री दांडगे, पूर्व प्राथमिक विभाग समन्वयक सौ. डायना बोर्डे उपस्थित होत्या. शाळेतील शिक्षिका सौ. अश्विनी पिंगळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. समीक्षा ठोंबरे या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
