
शिरूर { डेली न्यूज पोस्ट 24}
या पक्षप्रवेशामुळे शिरूरच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत असून, टाकळी हाजी जिल्हा परिषद गटातून भाजपची उमेदवारी गावडे यांनाच मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
त्यानंतर झालेल्या विविध निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षासाठी सक्रिय आणि निष्ठावान भूमिका बजावली. राजेंद्र गावडे हेही गेल्या काही महिन्यापासून टाकळी हाजी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती.
काल टाकळी हाजी येथे झालेल्या सभेत समर्थकांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत अन्य पक्षात जाण्याचा आग्रह धरला आणि अखेर आज भाजप प्रवेशाचा निर्णय घेण्यात आला.
अशोक माशेरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुनीता गावडे, शिरूरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे, शिरूर तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष बाबाजी निचित तसेच अनेक गावचे सरपंच, चेअरमन आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.