महाराष्ट्र

शिरूरच्या पोलीस उपअधीक्षकपदी रवींद्र भोसले 

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम, 24}: शिरूर उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदाची सूत्रे रवींद्र भोसले यांनी नुकतीच स्वीकारली आहेत. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले प्रशांत ढोले यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रवींद्र भोसले यांनी यापूर्वी गडचिरोली येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून काम  केले आहे. शिरूरमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले.

बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई, अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम तसेच वाहतूक आणि रहदारीमध्ये शिस्त निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button