Uncategorizedराष्ट्रीय

रयत शिक्षण संस्था शिरूरच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून दादा अमर रहे अशी रचना सादर करून वाहिली अनोखी श्रद्धांजली

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम 24) :महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना  विद्यार्थ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून भव्य स्वरूपातील दादा अमर रहे ही रचना साकारत श्रद्धांजली वाहिली.

या वेळी शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत शिस्तबद्ध रचनेत a श्रद्धांजलीचा संदेश मांडला. यवेळी परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित शिक्षक व पालकांनीही दोन मिनिटांचे मौन पाळून अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण केली.

सामाजिक, राजकीय व विकासात्मक कार्यासाठी ओळखले जाणारे अजितदादा पवार यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून अभिवादन करण्यात आल्याचे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान शाहिदखान पठाण यांनी सांगितले सांगितले. ते म्हणाले की अजित दादा पवार रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य होते. शिरूर तालुका विषयी त्यांना विशेष ममत्व होते. त्यांच्या मार्गदर्शनातून शिरूर मध्ये विविध विकास कामांची पायाभरणी झाली. अजित दादा पवार यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अतुलनीय असल्याचेही पठाण यांनी सांगितले.

न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक संजय मचाले, उपमुख्याध्यापिका सौ. व्ही. बी.. खोमणे, पर्यवेक्षक ए. के सरोदे  आदी यावेळी होतेविद्यार्थ्यांच्या सहभागातून वाहण्यात आलेली ही श्रद्धांजली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button