Uncategorized

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिरूरकरांच्या वतीने दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय येथे श्रद्धांजली सभा

शिरूर { डेली न्यूज पोस्ट 24}लोकनेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शिरूर शहरात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिरूरमधील नागरिकांच्या वतीने तसेच सर्व पक्षीय संघटनांच्या सहभागातून ही श्रद्धांजली सभा रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता शिरूर नगरपरिषद  मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.

या श्रद्धांजली सभेस विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच सर्व स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सभेस शिरूर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

पदापलीकडे जाऊन लोकांच्या मनात घर करणाऱ्या व्यक्ती फार विरळा असतात. शिरूरकरांसाठी अजितदादा पवार हे केवळ उपमुख्यमंत्री नव्हते, तर विकासाची जबाबदारी आपुलकीने स्वीकारणारे आपलेच माणूस होते. लहान कार्यकर्त्यांपासून अनुभवी नेत्यांपर्यंत सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, थेट भेटीतून किंवा फोनवरून संवाद साधणारे लोकनेते म्हणून त्यांची ओळख होती.

शिरूर तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या विकासकामांची पायाभरणी त्यांच्या दूरदृष्टीतून झाली. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण आणि नागरी सुविधा यांसह विविध क्षेत्रांत त्यांनी दिलेला विकासाचा ठसा आजही स्पष्टपणे जाणवतो. या विकासपुरुषाला शिरूरकरांच्या वतीने कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी ही श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button