राष्ट्रीयविशेष

छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद, वक्तृत्व स्पर्धा व उस्फुर्त वक्तृत्व स्पर्धेतील वादविवाद स्पर्धेत ‘पहाडे विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर’ यांनी तर वक्तृत्व स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालय गटामध्ये  ‘आर. एम. डी. विद्यानिकेतन कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज कोंढापुरी’ या संघानी मानाचा ‘छत्रपती संभाजी महाराज सांघिक फिरता सांघिक चषक पटकाविला .

शिरूर -{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद, वक्तृत्व स्पर्धा व उस्फुर्त वक्तृत्व स्पर्धेतील वादविवाद स्पर्धेत ‘पहाडे विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर’ यांनी तर वक्तृत्व स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालय गटामध्ये  ‘आर. एम. डी. विद्यानिकेतन कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज कोंढापुरी’ या संघाने मानाचा ‘छत्रपती संभाजी महाराज सांघिक फिरता सांघिक चषक व स्मृतिचिन्ह प्राप्त केले.
येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते महाराष्ट्रातून वाद-विवाद स्पर्धेमध्ये सहा संघ, वक्तृत्वस्पर्धेसाठी 36 विद्यार्थी व उत्स्फूर्तस्पर्धेसाठी 12 विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेचा उद्घाटन प्रसंगी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धर्मचंद फुलफगर तसेच संस्थेचे सचिव नंदकुमार निकम यांच्या उपस्थितीत होते . याप्रसंगी फुलफगर मनोगतामध्ये म्हणाले, “वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेचे हे 39 वे वर्ष असून चाळीसाव्या वर्षी ही स्पर्धा अधिक मोठ्या स्वरूपात जास्तीत- जास्त स्पर्धकांच्या सहभागाने आयोजित करण्यात यावी. ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवा आयाम देणारी व विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करणारी आहे असे प्रतिपादन त्यांनी केले .
तसेच शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम याप्रसंगी बोलताना म्हणाले की, “कथाकथन स्पर्धेपासून सुरू झालेली ही स्पर्धा आज वाद-विवाद, वक्तृत्व व उस्फुर्त वक्तृत्व स्पर्धेपर्यंतचा यशस्वी प्रवास करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे भरवली जाणारी ही एकमेव अशी वाद-विवाद व वक्तृत्व स्पर्धा आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, तसेच आजची तरुणाई, त्यांची मते जाणून घेता यावी व आजचा तरुण समाजाकडे कसा पाहतो या उद्देशाने ही स्पर्धा गेल्या अनेक वर्षापासून अखंडपणे महाविद्यालयात घेतली जाते. असे  ते  म्हणाले.शिवपुत्र संभाजी महाराज यांचा जीवन संघर्ष, साहित्य व ज्ञानाचे उपासक असणाऱ्या ज्वलनतेचे तेजस्वी छत्रपती संभाजीराजांचे कर्तुत्व त्यांचे साहित्यिक योगदान, या धुरंदर राज्यकर्त्याची यशस्वी गाथा ही त्यांनी या कार्यक्रमाप्रसंगी विशद केली.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना डेली न्यूज पोस्ट 24 च्या वतीने भावपूर्ण आदरांजली

या कार्यक्रमाच्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.सी. मोहिते म्हणाले, “ आजचे तरुण अशा स्पर्धांधून अभ्यासू व संशोधक वृत्तीने आपले विषय मांडतात. तसेच व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरते” .
या वादविवाद स्पर्धांमध्ये सर्वाधिक गुण मिळवून ‘पहाडे विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर’ येथील विद्यार्थ्यांनी मानाचा ‘छत्रपती संभाजी महाराज सांघिक फिरता चषक व स्मृतिचिन्ह’ पटकविले. यामधील प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे :
१. प्रथम क्रमांक- आदित्य ज्ञानेश्वर दरोडे, विधी महाविद्यालय संभाजीनगर,
२ द्वितीय क्रमांक- सुजित पानसंबळ, न्यू आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज, अहिल्यानगर
३. तृतीय क्रमांक विभागून- विश्वास दसगुडे, चां.ता. बोरा महाविद्यालय, शिरूर व अशितोष संतोष भागवत, न्यू आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, अहिल्यानगर
तसेच वक्तृत्व स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालय गटामध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या ‘आर. एम. डी. विद्यानिकेतन कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज कोंढापुरी’ या संघाने मानाचा ‘छत्रपती संभाजी महाराज सांघिक फिरता चषक व स्मृतिचिन्ह’ पटकविले.
यामधील प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे :
१. प्रथम क्रमांक -काझी हुसेन मा.निजमोद्दीन, डॉ. झाकीर हुसेन कला, वाणिज्य जुनिअर कॉलेज, परभणी.
२. द्वितीय क्रमांक- आगलावे सिद्धी सोमनाथ, ‘आर. एम. डी. विद्यानिकेतन कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, कोंढापुरी
3. तृतीय क्रमांक- पवार जयेश संतोष, अण्णासाहेब वाघिरे कॉलेज, ओतूर- जुन्नर.
तसेच उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत – गौरी रामचंद्र घिगे, श्री. भैरवनाथ ज्युनिअर कॉलेज आलेगाव पागा यांचा क्रमांक आला
स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.सी. मोहिते, उपप्राचार्य प्रा. एच. एस. जाधव उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे समन्वयक प्रा .डॉ. ईश्वर पवार, पर्यवेक्षक प्रा. अर्जुन वनवे, समन्वयक प्रा. सुमित्रा बांगर कनिष्ठ महाविद्यालय व वादविवाद वक्तृत्व व इतर स्पर्धा समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा. डॉ. पवार यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.डॉ. क्रांती पैठणकर यांनी केले व आभार प्रा. सुमित्रा बांगर यांनी मानले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून
, नीता गायकवाड, उषा वाखारे,शरद पाटील, सुरेश गायकवाड, प्रा. घेगडे, प्रा. बैनाडे यांनी काम पहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button