निधन वृत्त
हेमंत राणे यांचे निधन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट 24}: बागवान नगर येथील हेमंत अमृतराव राणे वय ५० यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई वडील, १ बंधू , विवाहित बहीण असा परिवार आहे.
राणे यांचा काही दिवसापूर्वी अपघात झाला होता.या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते दवाखान्यात उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले. धन्वंतरी पतसंस्था शिरूर येथे शाखा व्यवस्थापक म्हणून ते काम करत. तर अखिल राम आळी गणेश मित्र मंडळ याचे ते कार्यकर्ते होते. परिसरातील विविध धार्मिक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा.
सेवानिवृत्त शिक्षक अमृत राणे हे त्यांचे वडील होत तर सीताबाई थिटे औषध निर्माण महाविद्यालय येथील कर्मचारी मिलिंद राणे हे बंधू होत.
