Uncategorized
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शोकसभेत भावना व्यक्त करताना अनेकजण भावना विवश

शिरूर { डेली न्यूज पोस्ट 24}शिरूर शहरातील विविध संस्था व संघटनांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित सभेत शोकाकुल वातावरण अनुभवायला मिळाले. दादांच्या आठवणींनी उपस्थितांचे डोळे पाणावले;
भावना व्यक्त करताना अनेकांना हुंदका आवरता आला नाही. अजितदादा पवार यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.
या वेळी आमदार माऊली कटके आदरांजली वाहताना भावनाविवश झाले. माजी आमदार अशोक पवार केले की अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र ला अनेक चांगला गोष्टी शिकविल्या. माझ्या त्याच्या समवेत ३२ वर्षाच्या राजकीय प्रवास आहे. दादाच्या जाण्याने मोठी हानी झाली आहे.अनेक पैलू दादांचे महाराष्ट्राने पाहिले.वक्तशीर पणा वेळेचे महत्व दादा कडून शिकण्या सारखे असल्याचे ते म्हणाले.अजितदादाचे शरद पवार यांच्यावर निस्सीम प्रेम होते. विकासाची गंगा शिरूर तालुक्यात अजितदादांनी आणली.विधानसभा निवडणुकीनंतर दादांनी कधी माझा राग राग केला नाही. वैचारिक प्रगल्भता दादांच्या मध्ये होती. कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम त्यांनी दिली. विकासाचे व्हिजन दादांकडे होते.माजी आमदार सूर्यकांत पलांडे म्हणाले की महाराष्ट्राचा जडणंघडणीत अजितदादांचे मोठे योगदान आहे. राजकीय विचारांची प्रगल्भता त्यांच्या नेतृत्वात होती. शाहू फुले आंबेडकर यांच्या वारसा दादानी समर्थपणे चालविला.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाल्या पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणाले की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कठीण काळात त्याच्या बरोबर काम करता आले. अजितदादा यांनी दाखवून दिले की ते कामाचे माणूस आहेत.
नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंगअण्णा थोरात, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. सुभाष पवार, अॅड. बाबुराव पाचंगे, बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, डॉ. परवेझ बागवान, माजी नगरसेवक विनोद भालेराव, आशा पाचंगे, साधना शितोळे, रवींद्र सानप, प्रियंका बडगर, नगरसेवक निलेश पवार, प्रकाश बाफना, जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष संजय बारवकर, श्रुतिका झांबरे, डॉ. दीपक गायकवाड, सभापती आयेशा सय्यद, माजी उपनगराध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, शिरूर वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. उदय सरोदे, चेतन साठे रमेश गायकवाड, आप्पासाहेब वर्पे,आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रा. डॉ. दीपक गायकवाड यांनी दादांच्या निधनाने विविध विकासप्रकल्पांना दिशा देणारा व अर्थशास्त्राचा उत्तम जाणकार नेता आपण गमावल्याची खंत व्यक्त केली. रवींद्र धनक म्हणाले की दादांनी समाजकेंद्री राजकारण केले. पक्षीय चौकटींपलीकडे जाऊन मानवी मूल्यांचा गौरव करणारे राजकारण त्यांनी रुजवले. शेतकऱ्यांचे व सहकार क्षेत्रातील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले; त्यामुळे त्यांचे जाणे हा समाजासाठी मोठा धक्का आहे.



