निधन वृत्त
Related Articles
प्रगतिशील शेतकरी मधुकर आबाजी घावटे यांचे निधन
2 weeks ago
सुरेखा बाळकृष्ण जोशी यांचे निधन
2 weeks ago
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: कारेगाव (ता. शिरूर) येथील जुन्या पिढीतील नेते, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, समाजसेवक आणि उद्योजक माणिकचंदजी ताराचंदजी ओस्तवाल{ काकाजी }(वय १०४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या निधनाने कारेगावसह परिसरातील सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माणिकचंद ओस्तवाल हे गांधीवादी विचारांचे कट्टर अनुयायी होते.
त्यांनी आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपत विविध धार्मिक, सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. त्यांच्या शांत, संयमी व सर्वसमावेशक स्वभावामुळे परिसरात त्यांना विशेष मानाचे स्थान होते.







