Uncategorized

डेक्कन स्कूलच्या वर्धापन दिनानिमित्त शिरूर येथे रविवारी १४ जून रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन

शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}बाबुराव नगर येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त रविवार, १४ जून रोजी शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

१४ जून २०१६ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. गेल्या दहा वर्षांत शाळेने शिरूरच्या शैक्षणिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले असून, संस्कारक्षम शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमी नागरिक घडविण्याचे कार्य शाळेकडून सातत्याने करण्यात येत आहे.

दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता होणार असून, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि महादेव बल्लाळ नामजोशी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात येणार आहे. यावेळी शाळेच्या वार्षिक अहवालाचेही विमोचन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल महेश शेळके, उद्योजक सुरेश भांगे आणि उद्योजक संजय डांगे उपस्थित राहणार आहेत. तसेच शाळेच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य सुधाकर पोटे, व्ही. डी. कुलकर्णी, गणेश मराठे, डॉ. नूतन क्षीरसागर, प्रा. सौ. संध्या कुलकर्णी यांच्यासह पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी, सभासद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, शाळेने सीएसआर योजनेअंतर्गत दिल्ली येथील ‘युवा अनस्टॉपेबल’ संस्थेच्या सहकार्याने सुमारे २५ लाख रुपये खर्चून अत्याधुनिक स्टेम लॅब उभारली असून, या लॅबचे उद्घाटनही लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार यांनी दिली.

º

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button