Uncategorizedक्राईम
मांडवगण फराटा गोळीबार प्रकरणातील दोन मुख्य आरोपी जेरबंद साताऱ्यातून अटक; दोन गावठी पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे जप्त
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}मांडवगण फराटा येथील गोळीबार प्रकरणातील दोन मुख्य फरार आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे.
या आरोपींकडून दोन गावठी पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे तपासाला महत्त्वाची गती मिळाली आहे.
मांडवगण फराटा येथील भैरवनाथ क्रिकेट मैदानावर १९ मार्च २०२६ रोजी क्रिकेट सामना सुरू असताना दोन गटांमध्ये वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान गोळीबारात झाले. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांन्वये तसेच भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वी काही आरोपींना अटक केली होती. मात्र, अक्षय उर्फ ईश्वर गोविंद पाटील (वय ३२, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, मूळ रा. गोंदी, ता. जामनेर, जि. जळगाव) आणि सत्यम उर्फ पप्पू दत्तात्रय कड (वय २६, रा. कडाची वाडी, ता. खेड, जि. पुणे) हे दोघे मुख्य आरोपी फरार होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी सातारा जिल्ह्यात वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना सातारा जिल्ह्यातून अटक केली. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अक्षय पाटील याच्याविरुद्ध मारामारी, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी सत्यम कड याच्यावरही मारामारी, खून व आर्म्स अॅक्टअंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. दोघेही वारंवार ठिकाणे बदलून राहत असल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते.

विशेष पथकाची कारवाई
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक परशुराम लोहारदार,
नितीन पाटील, पोलीस अंमलदार गणेश जाधव, गणेश जगताप, राजेश पवार, तुषार मोरे, राम नमस्कार, धोंडू जाधव, शेखर पाटील, रमेश चव्हाण, पोलीस अंमलदार निलेश पिसाळ, विजय शिंदे, सचिन भोसले, नितीन धायगुडे, निखिल यादव, अंबादास थोरात, देवदास नागरे आणि अजय पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
नितीन पाटील, पोलीस अंमलदार गणेश जाधव, गणेश जगताप, राजेश पवार, तुषार मोरे, राम नमस्कार, धोंडू जाधव, शेखर पाटील, रमेश चव्हाण, पोलीस अंमलदार निलेश पिसाळ, विजय शिंदे, सचिन भोसले, नितीन धायगुडे, निखिल यादव, अंबादास थोरात, देवदास नागरे आणि अजय पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 
