राष्ट्रीय

शिरूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी विनोद पाटील; कायदा-सुव्यवस्था व महिला सुरक्षेला प्राधान्य

oplus_131074

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी विनोद पाटील यांनी नुकतीच सूत्रे स्वीकारली आहेत. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या बदलीनंतर पाटील यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस सेवेत दीर्घ अनुभव असलेले पाटील यांनी मुंबई येथे २१ वर्षांहून अधिक काळ पोलीस निरीक्षक म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सन १९९६ मध्ये ते पोलीस सेवेत दाखल झाले. सुमारे आठ महिन्यांपूर्वी त्यांची पुणे ग्रामीण पोलीस दलात बदली झाली होती.

सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी शिरूर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, महिला सुरक्षेला अधिक बळकटी देणे, रोड रोमिओंवर कारवाई करणे तसेच वाहतूक व्यवस्थेतील शिस्त राखणे या बाबींना प्राधान्य दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले.

शिरूरसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरात नागरिकांच्या सुरक्षिततेसह गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचेही पाटील यांनी सांगितले. त्यांच्या नियुक्तीमुळे शिरूर पोलीस ठाण्याच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button