विशेष

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}आई… शब्द छोटा, पण अर्थ अथांग. संघर्ष, त्याग आणि मायेचा अखंड झरा असलेली आई जेव्हा व्यासपीठावरून थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधते, तेव्हा तो क्षण केवळ कार्यक्रम राहत नाही, तर पिढ्यांना जोडणारा अनुभव ठरतो. अशीच भावस्पर्शी अनुभूती शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात येत्या गुरुवारी 22 जानेवारी रोजी अनुभवायला मिळणार आहे.
त्यांच्या अनुभवांच्या ओघातून उलगडणारा आईपणाचा अर्थ, संघर्षातून उभे राहण्याची ताकद आणि ‘कोणी तरी आपल्या पाठीशी आहे’ ही जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात नवी उमेद पेरणार आहे.



