राष्ट्रीयविशेष

वंदे मातरम या गीताच्या 150 व्या वर्षानिमित्त शिरूर येथे हजारो विद्यार्थ्यांनी केले सामूहिक गायन

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम- 24‘}वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शहरातील रयत शाळेच्या मैदानावर हजारो विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’ या  गीताचे सर्व कडव्यांसह सामूहिक गायन केले. “वंदे मातरम्, भारत माता की जय”च्या घोषणांनी परिसर भारावून गेला.बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या या गीताच्या १५० व्या वर्षानिमित्ताने विविध कार्यक्रमाच्या आयोजना संदर्भात तालुकास्तरीय शासकीय समिती स्थापन करण्यात आली होती. तहसीलदार बाळासाहेब म्हस्के अध्यक्ष तर संतोष गोसावी सचिव होते.

लोकनेते आदरणीय मा. आमदार बाबुरावजी पाचर्णे यांच्या जयंती निमित्त डेली न्यूज पोस्ट टीम 24 चा वतीने विनम्र अभिवादन
मातोश्री कलावती नवले यांना डेली न्यूज पोस्ट च्या वतीने भावपूर्ण आदरांजली

या कार्यक्रमाला सहाय्यक गटविकास अधिकारी जयराम लहामटे, प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, विस्तार अधिकारी किसन खोडदे, प्रमुख वक्ते प्रशांत अवचट, समिती सदस्य विठ्ठल वाघ, संजय पारडे, अर्जुन खराबे,
संजय पारडे, दिनकर जाधव, बापुराव जगन्नाथ मोहर, प्राचार्य संजय मचाले, स्नेहल शिंदे, अण्णासाहेब सरोदे,माजी सैनिक शिवाजी अण्णा कदम , प्रा . सतीश धुमाळ,तानाजी राऊत,आदी सह विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक व माजी सैनिक उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते म्हणाले, “भारत आत्मनिर्भर आणि स्वावलंबी कसा बनेल याचा विचार युवकांनी करावा. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले आयुष्य अर्पण केले आहे.”
प्रमुख वक्ते प्रशांत अवचट यांनी ‘वंदे मातरम्’ गीताचा इतिहास सांगत या गीतातून देशातील एकात्मतेचा संदेश दिला जातो, असे नमूद केले. “हे गीत स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारे ठरले,” असे ते म्हणाले.
गडकोट किल्ला संवर्धन समितीचे अर्जुन खराबे आणि विठ्ठल वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले. विजयमाला विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नाटिका सादर केली, तर विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीताने वातावरण भारावून टाकले. माजी सैनिकांच्या वतीने देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांना अभिवादन करण्यात आले.
या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. यात विदयाधाम प्रशाला, रसिकलाल माणिकचंद इंग्लिश मिडीयम व ज्युनियर कॉलेज, ज्ञानगंगा विद्यालय, जीवन विकास मंदिर, गुरुवर्य शंकरराव भुजबळ विद्यालय, सूर्यकांत पलांडे ज्युनियर स्कूल, चांदमल ताराचंद बोरा कॉलेज आणि शासकीय आयटीआय कारेगाव या संस्थांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशस्विता वारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमित परदेशी यांनी मानले..येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त सामुदायिक वंदे मातरम् गायन करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य श्री व्हि डी कुलकर्णी, श्री. गणेश मराठे, प्राचार्य डॉ. समीर ओंकार, शिक्षक प्रतिनिधी सौ. जयश्री दांडगे, पूर्व प्राथमिक शाळा समन्वयक सौ. डायना बोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शाळेतील शिक्षक श्री. सखाराम पुरी यांनी वंदे मातरम् निर्मितीचा इतिहास तसेच वंदे मातरम् गीताचा अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. शाळेचे प्राचार्य डॉ समीर ओंकार यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील वंदे मातरम् चे महत्व विषद केले. श्री. व्हि डी कुलकर्णी यांनी राष्ट्र भक्तीने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी समर्पित व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. सौ. प्रिया नरवडे यांनी सूत्र संचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी साडे पाचशे विद्यार्थ्यांनी संपूर्ण वंदे मातरम् चे सामुदायिक गायन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button