शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24 }छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच वाणीचे जादूगार पूज्य गुरुदेव श्री रमणीक मुनीजी म.सा. यांच्या ४७ व्या दीक्षा दिनानिमित्त आणि शिरूर भूषण दानशूर व्यक्तिमत्त्व भामाशाह रसिकलालजी धारीवाल यांच्या जयंतीनिमित्त व कापड बाजार गणेश मित्र मंडळ यांच्या ९९ वर्षानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १३१ जणांनी रक्तदान केले.
शिबीरास नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया, भाजपचे शहराध्यक्ष नगरसेवक नितीन पाचर्णे नगरसेवक सागर नरवडे, निलेश पवार हिमानीश्री महाराज साहब माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, संघपती भरत चोरडिया, सुनील धाडीवाल, संदीप बिहाणी आदी यावेळी उपस्थित होते.
“रक्तदान करा… राष्ट्रीय एकात्मता वाढवा…” या संदेशाखाली आयोजित करण्यात आलेले हे शिबिर जैन पंचायत भवन, नगरपालिकेच्या समोर, शिरूर येथे होणार आहे.
या रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
या उपक्रमास श्री. सकल जैन समाज, शिरूर यांचे सहकार्य लाभले. शिबिराचे आयोजन कापड बाजार मित्र मंडळ व ओम रक्त केंद्र, शिरूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
रक्तदान हीच खरी मानवसेवा असून गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी नियमित रक्तदान करावे असे आवाहन प्रितेश कोठारी व पंकज कोठारी यांनी यावेळी केले.