शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}
शिरूर–घोडनदी परिसरात भक्तीचा महासागर उसळण्याची चाहूल लागली आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पं. आचार्य प्रदीपजी मिश्रा (सीहोरवाले) यांच्या अमृतवाणीमधून रंगणाऱ्या भव्य श्री शिव महापुराण कथेच्या आयोजनासाठी आता शिरूरकर सज्ज झाले आहेत.

मुख्य आयोजक प्रसिद्ध उद्योगपती व माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल, उद्योगपती आदित्य धारीवाल, नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचर्णे,पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, माजी सरपंच अरुण घावटे, माजी नगरसेवक विजय दुगड,
सुनील धाडीवाल, विनोद धाडीवाल, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र गावडे , लक्ष्मीकांत खाबिया, आबासाहेब सरोदे यांच्यासह शिवसेवा मंदिर ट्रस्ट व रामलिंग मंदिर ट्रस्टचे विश्वस्त, आजी-माजी नगरसेवक, विविध संस्था, महिला मंडळे आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कथेमुळे भाविकांना अध्यात्मिक प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल,” असे भावनिक प्रतिपादन प्रकाश धारीवाल यांनी केले. हा कार्यक्रम सर्वांचा असून तो यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.


