राष्ट्रीयविशेष

शिरूरमध्ये ‘स्वर्गरथ’ सेवेची दशकपूर्ती; ‘शवपेटी’ सेवेचा शुभारंभ

oplus_131074
oplus_131074
oplus_131074

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}सकल जैन समाज शिरूर आणि ‘स्पंदन प्रतिष्ठान’च्या पुढाकारातून २०१६ साली महाशिवरात्रीच्या दिवशी सुरू झालेल्या ‘स्वर्गरथ’ सेवेने रविवारी (१५ फेब्रुवारी) दहा वर्षांचा टप्पा पूर्ण केला. या दशकपूर्ती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग थोरात, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, संघपती भरत चोरडिया, नगरसेवक सागर नरवडे, माजी नगरसेवक सुकुमार बोरा, प्रकाश धाडीवाल, श्रेणिक नहार, युवा नेते राजुद्दीन सय्यद, रमाकांत बोरा, रमणलाल भंडारी, अजित डोंगरे, दादाभाऊ चौधरी, सुनील धाडीवाल, विलास लोढा, आनंद पतसंस्थेचे संचालक देवल शहा, पंडित गांधी, विक्रम पाचंगे, खुशाल गाडे, चंदूलाल भटेवरा, प्रवीण बोथरा, माजी मुख्याध्यापक देशमुख, सचिन खामकर, नितीन गायकवाड, निलेश नवले , मयूर नहार,आदी मान्यवर उपस्थित होते.

माफक दरात अंत्ययात्रेची सेवा

एखाद्याच्या घरी मृत्यू झाल्यानंतर मृतदेह घरापासून अमरधाम स्मशानभूमीपर्यंत माफक दरात पोहोचविण्याची सुविधा ‘स्वर्गरथ’द्वारे उपलब्ध करून देण्यात येते. दहा वर्षांपूर्वी जैन समाजातील युवकांनी अशी सेवा शहरात असावी, हा विचार मांडला. समाजातील बांधवांच्या आर्थिक योगदानातून वाहन खरेदी करून त्याचे ‘स्वर्गरथ’मध्ये रूपांतर करण्यात आले. वाहनाच्या मागील बाजूस मृतदेह ठेवण्यासाठी टेबलसदृश व्यवस्था करण्यात आली आहे.

गेल्या दशकात हजारो मृतदेह या सेवेच्या माध्यमातून स्मशानभूमीत पोहोचविण्यात आले आहेत. चालक उपलब्ध नसल्यास सकल जैन समाज आणि ‘स्पंदन प्रतिष्ठान’चे कार्यकर्ते स्वतःची दैनंदिन कामे बाजूला ठेवून चालक म्हणून सेवा बजावतात.

वाढत्या शहरविस्तारात सेवेचे महत्त्व

शिरूर शहरात मागील काही वर्षांत नागरीकरण आणि शहरीकरण झपाट्याने वाढले आहे. उपनगरांची संख्या वाढल्याने अंत्यसंस्कारासाठी वाहतुकीची गरजही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ‘स्वर्गरथ’ सेवा अधिक उपयुक्त ठरत असल्याचे प्रतिष्ठानचे राहुल बोथरा यांनी सांगितले.

‘शवपेटी’ सेवेची सुरुवात

दशकपूर्ती वर्षानिमित्त यंदापासून ‘शवपेटी’ सेवा सुरू करण्यात आली असून, याचे लोकार्पण कार्यक्रमात करण्यात आले. नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ही सेवा सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच स्मशानभूमीत बाकडे बसविण्याचे कामही प्रतिष्ठानमार्फत करण्यात आले आहे.

  • पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. माजी नगरसेवक रवींद्र धनक व सुकुमार बोरा यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल बोथरा यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी, तर आभार संघपती भरत चोरडिया यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button