शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम -24 } त्रिपुरी पौर्णिमेनिमित्ताने शिरूर पंचक्रोशीचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामलिंग महाराज मंदिर तसेच स्टेट बँक कॉलनीतील संत श्री गजानन महाराज मंदिर येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. दीपोत्सवामुळे संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता.
शिरूर शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेले प्रभू श्रीरामलिंग मंदिर हे पंचक्रोशीचे आराध्य दैवत आहे. भगवान श्रीराम वनवास काळात या परिसरात आले असताना त्यांनी स्वतः येथे शिवलिंगाची स्थापना केल्याची आख्यायिका प्रचलित आहे. त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने मंदिर परिसर आकर्षक रांगोळ्यांनी, फुलांच्या सजावटीने व हजारो पणत्यांच्या प्रकाशाने सजला होता. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.दरम्यान, ब्राह्मण सभा शिरूर यांच्या वतीने स्टेट बँक कॉलनीतील घाटपांडे यांचे संत श्री गजानन महाराज मंदिरातही दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो दिवे प्रज्वलित करून परिसर उजळविण्यात आला. या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक व्ही. डी. कुलकर्णी, विलासराव गोसावी, प्राचार्य डॉ. समीर ओंकार, घाटपांडे काका, विश्वास मुळे, प्रशांत जोशी, ॲड. प्रतिक काशीकर तसेच सौ. सुनंदा गोसावी, ॲड. सीमा काशीकर, अनघा पाठक, तृप्ती जगदाळे, आदिती अर्जुनवाडकर, माधवी ओंकार, प्रतिमा गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.या दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहर व परिसर भक्तीभावाने उजळून निघाला होता.
मातोश्री कलावती नवले यांना डेली न्यूज पोस्ट च्या वतीने भावपूर्ण आदरांजली
लोकनेते आदरणीय मा. आमदार बाबुरावजी पाचर्णे यांच्या जयंती निमित्त डेली न्यूज पोस्ट टीम 24 चा वतीने विनम्र अभिवादन