Uncategorizedविशेषशैक्षणिक
व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा जल्लोषात
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: येथील व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. साई गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या सोहळ्याला विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वच्छता समितीचे सभापती एजाज बागवान, सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव, पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनिता पोटे,
नियोजन व विकास गृहनिर्माण समिती सभापती स्वाती साठे, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती स्वप्नाली जामदार, नगरसेविका संगीता मल्लाव, रिंकू जगताप, स्वीटी शिंदे, नगरसेवक सागर नरवडे, निलेश पवार, अमोल चव्हाण आदींसह संस्थेचे अध्यक्ष विकास पोखरणा,
विश्वस्त सुवालाल पोखरणा, पूजा पोखरणा, आदित्य पोखरणा, आदिती पोखरणा, नोटरी देवराम धुमाळ, डेक्कन स्कूलचे मुख्याध्यापक डॉ.समीर ओंकार, बालाजी स्कुलचे मुख्याध्यापक विनायक म्हसवडे,प्रा. अलका बेलोटे, माजी नगरसेवक विनोद भालेराव, महेश कटारिया, वृषाली मुसळे , ज्ञानगंगा स्कुलचे व्ही. डी. शिंदे उपस्थित होते. स्वागत मुख्याध्यापक संतोष येवले यांनी तर आभार मुख्याध्यापिका पसक्किन कासी यांनी केले.



