राष्ट्रीय

शिरूर  न्यायालयात १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम, 24}राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुका न्यायालय तसेच पुणे येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात शनिवार, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमधील प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढली जाणार आहेत. यामध्ये वीज व पाणी बिल वाद, बँक वसुलीची प्रकरणे, मोटार अपघात दावे, कौटुंबिक वाद, तडजोडयोग्य फौजदारी तसेच दिवाणी स्वरूपाच्या विविध प्रकरणांचा समावेश आहे.
लोकअदालतीच्या माध्यमातून प्रकरणे तडजोडीने निकाली काढल्यास नागरिकांना कमी खर्चात, जलद व सुलभ न्याय मिळतो. यामुळे न्यायालयीन वेळेची बचत होऊन पक्षकारांना मोठा दिलासा मिळतो.
ज्या नागरिकांना आपली प्रकरणे या राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवायची असतील, त्यांनी संबंधित न्यायालय किंवा शिरूर तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिरूर तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तसेच जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पवार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button