Uncategorized

शिरूर तालुक्यात दहावीच्या परीक्षेस सुरुवात, १५ परीक्षा केंद्रावर ६६९७ विदयार्थी

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाची मानली जाणारी अशी इयत्ता दहावीची परीक्षा आज पासून सुरू झाली. शिरूर तालुक्यातील परीक्षा केंद्रावरून सुमारे ६६९७ एवढे विद्यार्थी परीक्षेस बसले असून तालुक्यातील सर्वाधिक विद्यार्थी शिरूर शहरातील विद्याधाम प्रशाला येथील  परीक्षा केंद्रावर सुमारे ७०० विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

आज सकाळी शिरूर येथील विद्याधाम प्रशाला येथील परीक्षा केंद्रावर प्राचार्य महासंघाचे माजी अध्यक्ष तथा शिरूर शिक्षण प्रसारक मंडळचे सचिव नंदकुमार निकम , मुख्याधायापक  गुरुदत्त पाचर्णे, यांच्या सह थोरात विद्यालयच्या मुख्याध्यापिका स्वाती थोरात, संजय बाफना व संजय कडेकर आदीच्या उपस्थितीत विद्यार्थ्यानाचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. निकम यानी यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या

शिरूर शहरातील न्यू इंग्लिश स्कूल येथील परीक्षा केंद्रावर ६०४, श्री. मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे येथील केंद्रावर ५७३, न्यू इंग्लिश स्कूल मलठण येथे ४३०, सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदूर येथे १३५, श्री.छत्रपती संभाजी हायस्कूल कोरेगाव -४५४,श्री. संभाजीराजे विद्यालय जातेगाव बु. -५४७ , स्वा.सै.आर.बी.गुजर प्रशाला तळेगाव -६०३, विद्याधाम प्रशाला शिक्रापूर -७६९ , छत्रपती शिवाज माध्यमिक विद्यालय वडगाव रासाई-२२१, श्री. भैरवनाथ विद्यालय करडे -४५०, विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी -२९१, बापूसाहेब गावडे विद्यालय टाकळी हाजी -३३७, श्री.वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा -२४६, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सणसवाडी शिरूर ३३७ अश्या १५ परीक्षा केंदातून  ६६९७ विद्यार्थी परीक्षेस बसले असल्याची माहिती शिक्षण खात्यातील अधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button