शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम-24 }शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत जनता दल धर्मनिरपेक्षचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना निवेदन देऊन याबाबत उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात शेवाळे यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यासंबंधी उपाययोजना करण्याबाबत निवेदन दिले. शिरूर तालुक्यासह परिसरात बिबट्यांच्या मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांनी आता गंभीर स्वरूप धारण केले आहे.


या घटनांमुळे शिरूर तालुक्यासह परिसरातील नागरिक धास्तावले आहेत. तरी यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी संबंधितांस बैठकीचे आदेश व्हावेत अशी विनंती या निवेदनाद्वारे शेवाळे यांनी वनमंत्री यांच्या कडे केली आहे.