राष्ट्रीयविशेष

शिरूर तालुक्यात आणखी एक बिबट्या जेरबंद

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम – 24}बिबट्याचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असणारा तालुक्या अशी ओळख निर्माण झालेल्या शिरूर तालुक्यातील बिबटे जे्रबंद करण्यासाठी वनखाते अलर्ट मोड वर असून बिबटयाना जे्रबंद करण्या करिता बिबट्याचे वास्तव्य असणा-या भागात मोठया प्रमाणावर पिंजरे लावण्यात आले असून आज सकाळी पिंपरखेड, ता. शिरूर येथे वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबटया जेरबंद झाला.पिंपरखेड मधील रोहिदास टेमकर यांचे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट जेरबंद झाला आहे. पकडलेल्या बिबटयास माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. हा बिबट मादी असून वय 6 वर्ष असल्याचे तालुका वनाधिकरी निलकंठ गव्हाणे यांनी सांगितले.काही दिवसापूर्वी पिंपरखेड परिसरातील दोन चिमुकले बिबटयाचे हल्ल्यात मृत्यूमुखी पडले.या परिसरात बिबटयाचा वावराने बिबट्याच्या मानवावर होणा- या हलल्याने भितीचे व असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले होते.शिरूर तालुक्यातील बिबटयाच्या वावराने ग्रामीण भागातील जनजीवनावर ही परिणाम झाला होता.या पार्शवभूमी वर ऍक्शन मोड वर येत वनखात्याने बिबटयाचा प्रश्नावर जनजागृती सह मोठया प्रमाणावर बिबट्यास जे्रबंद करण्यासाठी पिंजरे लावले असून मागील काही दिवसात २० हून अधिक बिबटे जे्रबंद करून त्यांची रवानगी माणिकडोह बिबट् निवारण केंद्राकडे करण्यात आली आहे.

वात्सल्य सिंधू फाउंडेशनच्या उषा वाखारे यांना वाढदिवसाच्या डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने हार्दिक शुभेच्छा

पत्रकार प्रा.डॉ. दत्तात्रय कारंडे यांना डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button