विशेष

शिरुर परिसरातील अपघात आणि वाहतुकी बाबत सुरक्षितता व  उपाया करिता लोक सहभाग आणि प्रशासन. .या विषयावर गुरुवार दिनांक ११ डिसेंबर रोजी बैठक

गुरुवार दिनांक ११ डिसेंबर रोजी सांय साडे पाच शिरूर बसस्थानकाजवळील शिवसेवा मंदिर मंडळ येथे मोठया संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24} शिरुर परिसरातील अपघात आणि वाहतुकी बाबत सुरक्षितता व  उपाया करिता लोक सहभाग आणि प्रशासन. .या विषयावर विचार विनिमय करण्यासाठी गुरुवार दिनांक  11 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजता शिरूर बसस्थानकाजवळील  शिवसेवा मंडळ- मंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस मोठया संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन रवींद्र धनक यांनी केले आहे.
शिरूर परिसरात गेल्या काही महिन्यांत रस्ते अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने समन्वयित उपाययोजना आवश्यक आहे. नागरिक, स्थानिक संस्था आणि सरकारी यंत्रणांची एकत्रित बैठक गुरुवार दिनांक ११ डिसेंबर रोजी शिवसेवा मंडळ  मंदिर येथे होणार आहे.
शहरातील वाढती वाहने, अपुरी पार्किंग सुविधा, बायपासवरील बेफाम वेग, रात्री प्रकाशयोजनेचा अभाव तसेच चुकीच्या ठिकाणी निर्माण झालेली स्पीड ब्रेकर यामुळे प्रवास अधिकाधिक धोकादायक बनत असल्याचे धनक यांनी निवेदनात म्हटले आहे. शिरूर बायपासवरील तीन अंडरपासपैकी काही ठिकाणी योग्य उतार–चढाव नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय सरदवाडी परिसरातील अशास्त्रीय स्पीड ब्रेकर आणि पुणे–अहिल्यानगर महामार्गाच्या नव्या कामामुळे येणाऱ्या संभाव्य वाहतुकीच्या कोंडीचीही त्यांनी नोंद घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी, रस्ते बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण, पोलीस, नगरपालिका, ॲम्बुलन्स सेवा तसेच सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येऊन व्यापक धोरण आखण्याची गरज असल्याचे धनक म्हणाले.
शिरूरमधील वाढत्या अपघातांविरोधात ठोस उपाययोजना, आवश्यक सुधारणा आणि संबंधित खात्यांकडून कोणती कामे अपेक्षित आहेत यावर चर्चा करण्यासाठी विचारमंथन व नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.
“ही केवळ बैठक नसून शिरूरकरांच्या जीवित सुरक्षेसाठीचे जनआंदोलन असेल,” असे धनक म्हणाले. मोठ्या संख्येने  नागरिकांनी या बैठकीत  सहभागी होण्याचे आवाहनही धनक  केले आहे.

संकेत संतोष गांधी यांना डेली न्यूज टीम पोस्ट 24 च्या वतीने भावपुर्ण आदरांजली
पत्रकार प्रा.डॉ. दत्तात्रय कारंडे यांना डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button