विशेष
कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांना शिरूर येथे विविध संस्था संघटना यांच्या वतीने अभिवादन
बाजार समितीच्या आवारात शोकसभेचे आयोजन

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम -24}
शिरूर शहरातील विविध संघटना व सामाजिक संस्थेच्या वतीने कष्टकऱ्यांचे नेते डॉ.बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिरूर कृषि उत्पन्न बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.या सभेत आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सभेचा सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व डॉ. बाबा आढाव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

बाजार समितीचे माजी संचालक बंडू जाधव, रिक्षा पंचायतचे अनिल बांडे, शेतकरी नेते नाथाभाऊ पाचर्णे,संघपती भरत चोरडिया,व्यापारी महासंघचे नेते माजी नगरसेवक संतोष भंडारी, अजित ओस्तवाल ,परेश सुराणा , कपिल बोरा, प्रितम चंडालिया शिरूर ग्रुप विकास सोसायटीचे अध्यक्ष आप्पासाहेब वर्पे ,शेतकरी संघटनेचे नितीन थोरात , हमाल पंचायती चे कुंडलिकराव दसगुडे,शिवाजीराव खेमनर,







