Uncategorized

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त शिरूरमध्ये अभिवादन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त शिरूर शहरात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले. समाजप्रबोधन, स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणाऱ्या गाडगे महाराजांच्या कार्याचा यावेळी आढावा घेण्यात आला.
कार्यक्रमास शहराध्यक्ष राहुल थोरात, सचिव दत्ता अभंग, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बारवकर, दिगंबर अभंग, संतोष अभंग, राजेंद्र शेजवळ, शशिकांत चव्हाण, श्री. शिशुपाल, मिथिल थोरात, महेश चोरडिया, किशन चव्हाण, राजेंद्र अभंग आदी मान्यवर उपस्थित होते.
गाडगे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद, व्यसनाधीनता आणि अस्वच्छता यांविरुद्ध प्रखर आवाज उठविला. “स्वच्छता हीच सेवा” हा त्यांचा संदेश आजही तितकाच समर्पक असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. गावोगावी जाऊन स्वच्छता मोहीम राबविणे, धर्मशाळा व शैक्षणिक संस्था उभारणे आणि दीनदलितांसाठी आयुष्य वेचणे, ही त्यांच्या जीवनकार्याची वैशिष्ट्ये असल्याचे सांगण्यात आले.
समाजात परिवर्तन घडविण्यासाठी केवळ विचार नव्हे, तर कृतीही तितकीच महत्त्वाची आहे, हा आदर्श गाडगे महाराजांनी घालून दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता, सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवा यांचा संकल्प करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप सामूहिक अभिवादनाने करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button