राष्ट्रीय
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}तालुक्यातील बेट भागातील टाकळी हाजी येथे शेतकऱ्याच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात सात वर्षांचा नर बिबट जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. तालुका वनाधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी यासंदर्भात माहिती दिली. 
टाकळी हाजी येथील पोपट महादू पवळे यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. त्यात हा बिबट अडकला. बिबट नर असून त्याचे वय अंदाजे सात वर्षे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राथमिक तपासणीनंतर त्याला येथील माणिकडोह बिबटया निवारा केंद्र येथे हलविण्यात आले.





