विशेष

इंटरनेट व स्क्रीन टाईमचे योग्य नियोजन आवश्यक: लेखिका, डिजिटल वेल-बिइंग आणि सॉफ्ट स्किल ट्रेनरच्या संस्थापक मुक्ता चैतन्य

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}आपल्या आयुष्यातून इंटरनेट संपूर्ण पणे काढून टाकू शकत नाही पण यांचा संतुलित वापर करून आपल्या स्क्रीन टाईमचे नियोजन करावे असे आवाहन  सायबर मैत्र, मुक्त पत्रकार व लेखिका, डिजिटल वेल-बिइंग आणि सॉफ्ट स्किल ट्रेनरच्या संस्थापक मुक्ता चैतन्य यांनी केले.

 येथील स्वातंत्र्यसैनिक गोपाळसिंग परदेशी शिशुनिकेतन येथे स्वातंत्र्यसैनिक गोपाळसिंग परदेशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त “मोबाईल आणि आपण : समजून घेऊया वापर आणि परिणाम” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी चैतन्य म्हणाल्या की छोट्या छोटया गोष्टी साठी आपण इंटरनेट वर अवलंबून आहे. इंटरनेट ॲडिशन्स एक आजार आहे. मुलांचा स्क्रीन टाईम ० ते २ वर्षा साठी मुलांना कोणत्याही स्क्रीन टाईम नको अस तज्ञाचे मत आहे. मूल त्याच्या भवताला तून शिकत असतो . स्क्रीन टाईम वाढल्यास मुलाचे भवताल कडे दुर्लक्ष होते. भवताल भान डिस्टर्ब् होते.

वय वर्ष ० ते २ वर्षात मुलांना मोबाईल दाखवू नका. वय ५ वर्ष ते १० वर्षाच्या मुलासाठी एक ते दीडतास स्क्रीन टाईम अपेक्षित आहे. तो टाईम सलग नसावा.

झोप ही महत्वाची आहे. पण झोपेच्या प्रश्न जगभर गंभीर होत आहे. झोप कमी होत आहे. त्यातून मानसिक स्वास्थावर परिणाम होत आहे. झोप पुरेशी न झाल्याने थकवा निर्माण होतो. सतत स्क्रीन बघून त्याच्या ही ताण निर्माण होत असतो.

आपल्या मानेवर प्रचंड ताण व वेदना सततच्या स्क्रीन टाईम मुळे येतो. सतत अंगठा चा वापर होतो व अंगठा सततच्या स्क्रीन टाईम मुळे दुखू लागतो.मोबाईल आपल्या डेटा गोळा करतो. मेंदूवर, झोपेवर परिणाम करतो.

आपण मोबाईल कधी किती वापरला पाहिजे याचे नियोजन केले पाहिजे. आपल्या स्क्रीन टाईम किती असावा याचे संतुलन ठेवता आले पाहिजे. इंटरनेटचे व्यसन किचकट आहे.

जोपर्यत वर्तणुकित बदल होत नाही तो तोपर्यंत इंटरनेट ॲडिशनल आहे हे कळत नाही . त्यामुळं इंटरनेट ॲडिशनल न होता त्याच्या संतुलित वापर करता आला पाहिजे असे त्या म्हणाल्या.इंटरनेट तुम्हाला तुमच्या आयुष्यातून संपूर्ण काढून टाकता येत नाही.

इंटरनेट आपल्या आयुष्याचा महत्वाचा घटक असून इंटरनेटच्या आपल्या गरजेनुसार संतुलित वापर करावा.

मुलांचे फोटो व्हिडीओ त्याच्या परवानगी शिवाय सोशल मीडिया वर टाकू नका.नाही म्हणण्याची सवय लहानपणापासून मुलांना लावा.कोणत्या ही अनोळखी लिंक वर क्लिक करू नका,अनोळखी नंबर वरून आलेल्या व्हिडीओ कॉल उचलू नका.झोपेच्या एक तास आधी व झोपेतून उठल्यावर एक तास मोबाईल वापरू नका.ऑनलाईन जगतात अनोळखी लोकांशी बोलू नका.ए आय स्टुल्स वर जास्त अवलंबून राहू नका असा सल्ला त्यांनी दिला.

मुख्याध्यापक गंगाधर तोडमल प्रास्ताविकात म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल वापराबाबत जागरूकता निर्माण करणे व त्याचे सकारात्मक-नकारात्मक परिणाम समजावून सांगणे हा या व्याख्यानाचा उद्देश आहे.

आयएएस अधिकारी डॉ. अय्याज तांबोळी सर यांना डेली न्यूज पोस्ट टीमच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

यावेळी कृषि लोक विकास संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक, प्रा. डॉ. दीपक गायकवाड,सुनील परदेशी, केतन परदेशी, मथुरा परदेशी, सामाजिक कार्यकर्त्या उषा वाखारे, डॉ. मनीषा चौरे, डॉ. शिल्पा घोडे, डॉ. वैशाली साखरे, नीता गायकवाड, स्वाती थोरात, मुख्याध्यापक दिलिप शिंदे, मुख्याध्यापिका निशा कोल्हे, मावळाई प्रकाशनचे डॉ. सुभाष गवारी, शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रदीप बारवकर, माजी मुख्याध्यापिका शंकुतला रसाळ, निलेश नहार, साबीरभाई शेख, नंदकुमार पिंजऱकर, प्रकाश कल्याणकर, महेंद्र परदेशी, सतीश गवारी, सविता धनक आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मोरे यांनी केले तर आभार वजीफा शेख यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button