राष्ट्रीय
विधानसभा आधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदासाठी प्रयत्न करणार : आमदार महेश लांडगे


सांगली शहरातील यशवंत नगर येथे राहणाऱ्या सौ. ऋतुजा सुकुमार राजगे या उच्चशिक्षित विवाहित महिलेने सासरच्या धर्मांतराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ शिरूर शहरात जाहीर निषेध आंदोलन व मोर्चा काढण्यात आला .

समस्त सकल हिंदू समाज शिरूर,विश्व हिंदू परिषद , बजरंग दल शिरुर प्रखंड , शिवबा संघटना टाकळी हाजी , यांच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .राजगे प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व शासनाने ताबडतोब धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली .


अनेकांच्या हातात विविध फलक होते . छ्त्रपती शिवाजी महाराज , ऋतुजा राजगे यांच्या प्रतिमा होत्या .हिंदूचे धर्मांतर थांबवा , धर्मांतर विरोधी कायदा करा ,प्राण सोडला धर्म नाही सोडला असे फलक हातात धरले होते .
मोर्चा शहरातील जुन्या पुणे अहिल्यानगर रस्त्याने बसस्थानक मार्गे शिरुर तहसिल कार्यालयावर गेला.
तहसिल कार्यालयाजवळ मोर्चा पोहोचल्यावर सभा झाली . यावेळी आमदार महेश लांडगे ,ह .भ. प.संग्राम बापू भंडारे ,वर्षा डहाळे आदी उपस्थित होते.

लांडगे म्हणाले ऋतुजाला न्याय देण्यासाठी यासंदर्भात राज्यभर जनजागृती करण्यात येईल .
मध्यंतरी शिरुर तालुक्यात धर्मांतराचा घटना घडल्या आहेत . शिरुर तालुक्यातील अनाधिकृत चर्च तीन महिन्यात पाडा असे आवाहन त्यानी प्रशासनाला केले .
वर्षा डहाळे म्हणाल्या की ऋतुजा राजगे यांनी प्राण सोडला पण धर्म सोडला नाही. स्वंत:च्या आस्तित्वाची जाणिव होवू द्या . विविध गावात अमिष दाखवून धर्मांतर केले जात आहे. धर्म टिकला तर कुटुंब टिकेल व कुटुंब टिकले तर राष्ट्र टिकेल .ऋतुजा राजगे यांच्या मृत्यु होवून इतके दिवस होवून ही महिला आयोगाने या प्रश्नी पुढाकार घेत कारवाई का केली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला .
संघटित व्हा व वज्रमूठ बांधून विविध प्रश्नांवर काम करावे असे आवाहन ह.भ प. संग्राम भंडारे यांनी केले .नानाजी पडळकर यांनी धर्मांतर विरोधी कायदा झालाच पाहीजे अशी मागणी यावेळी केली .
संघटित व्हा व वज्रमूठ बांधून विविध प्रश्नांवर काम करावे असे आवाहन ह.भ प. संग्राम भंडारे यांनी केले .नानाजी पडळकर यांनी धर्मांतर विरोधी कायदा झालाच पाहीजे अशी मागणी यावेळी केली .तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांना मोर्चाचा वतीने निवेदन देण्यात आले .
पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता .