Uncategorizedक्राईम

प्राईम कोल्ड कंपनीतून ७७ हजारांची केबल वायरची चोरी

शिरूर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24) – करडे ता . शिरुर  येथल  प्राईम कोल्ड कंपनी प्रा. लि. या कंपनीतून सुमारे ७७,००० रुपये किमतीची केबल वायर व आर्थिंग कॉपर पट्टी चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  प्रशांत शशीभूषण मंडल (वय ३५, व्यवसाय एचआरए , प्राईम कोल्ड कंपनी प्रा. लि.) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे . २५ जून २०२५ रोजी पहाटे ३ ते ३.३० वाजण्याच्या दरम्यान तीन  २० ते २५ वर्षाच्या अज्ञात व्यक्तींनी स्टोअर रूममधील उघड्या खिडकीतून प्रवेश करून कॉम्प्रेसर रूम व डिझेल रूममधील ४० हजार रुपये किमतीच्या ३५ रेकंवर वायर, १५ हजार किमतीच्या १६ एमएम वायर, २० हजार किमतीच्या २.५ एमएम वायर आणि २ हजार किमतीची १० मीटर आर्थिंग कॉपर पट्टी असा एकूण ७७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस हवालदार  पवार करीत  आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button