Uncategorized

आंबेडकर विचार मंचातर्फे व्याख्यानमालेचे आयोजन

  1. शिरूर, { डेली न्यूज पोस्ट टीम 24}:शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक व बौद्धिक विषयांवर आधारित ही व्याख्यानमाला २४ व २५ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता पार पडणार आहे.

या उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष असून,

शुक्रवार, २४ एप्रिल रोजी सामाजिक कार्यकर्ते व राजकीय विश्लेषक अजित अभ्यंकर हे “सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती व बुद्ध विचार” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर शनिवार, २५ एप्रिल रोजी सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर या “भारतीय राज्यघटना व अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य” या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

डेली न्यूज पोस्ट २४ च्या वतीने लोकजागृतीचे अध्यक्ष ओम प्रकाश सतीजा यांना भावपूर्ण आदरांजली

ही व्याख्यानमाला शिरूर येथील राजभोग बँक्वेट हॉल येथे होणार असून, कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंचाच्या अध्यक्षा सुवर्णाताई राजेंद्र लोळगे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button