विशेष
चैतन्य सद्गगुरु योगीराज श्री शंकर महाराज यांच्या समाधी दिनानिमित्त शिरूर येथे शुक्रवार दिनांक 24 एप्रिल रोजी भक्ती संगीत, श्री चे पोथी वाचन व महाप्रसाद
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}
चैतन्य सद्गुरू योगीराज श्री. शंकर महाराज यांच्या ७९ व्या समाधी दिनानिमित्त शिरूर (घोडनदी) येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २४ एप्रिल २०२६ रोजी हा कार्यक्रम होणार असून, शहरातील तिळवण तेली समाज मारुती मंदिर, मुंबई बाजार येथे कार्यक्रम पार पडणार आहेत.
सालाबादप्रमाणे आयोजित या सोहळ्यात सायंकाळी ५ वाजता भक्ती संगीताचा कार्यक्रम होणार असून, भक्ती गंधर्व म्हणून ओळखले जाणारे योगेशजी तपस्वी हे आपली प्रस्तुती सादर करणार आहेत.
त्यानंतर सायंकाळी ७ वाजता श्रींचे पोथी वाचन प्रदीप गादिया करणार आहेत . रात्री ८ वाजता श्रींची आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या निमित्ताने शिरूर परिसरातील तसेच बाहेरील भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे आयोजन श्री चैतन्य सद्गुरू शंकर महाराज सेवा प्रतिष्ठाण, शिरूर व भक्त परिवार यांच्या वतीने करण्यात आले असून, विविध कार्यकर्ते व भक्त मंडळाचा सहभाग लाभत आहे. इच्छुक भक्तांकडून ऐच्छिक देणगी स्वीकारली जाणार असल्याची माहितीही आयोजकांनी दिली.