Uncategorized

मुलांची इतरांच्या यशाशी तुलना करू नका. समाजमाध्यमांचा मर्यादित वापर ठेवत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा,”:- पालक-विद्यार्थी समुपदेशक संगीता पाटील

शिरूर : { डेली न्यूज पोस्ट टीम 24}“मुलांची इतरांच्या यशाशी तुलना करू नका. समाजमाध्यमांचा मर्यादित वापर ठेवत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा,” असे आवाहन पालक-विद्यार्थी समुपदेशक संगीता पाटील यांनी केले.

इन्फिनिट सीबीएसई अकॅडमी, शिरूर यांच्या वतीने शिवसेवा मंडळ सभागृहात दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिरूर रामलिंगचे उपसरपंच संजय शिंदे, माजी उपसरपंच बाबाजी वर्पे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे, राणीताई कर्डीले आदी उपस्थित होते.

संगीता पाटील म्हणाल्या, “अधिक गुण मिळाल्याने अहंकार बाळगू नये. जीवघेणी स्पर्धा आणि अवास्तव अपेक्षांमुळे विद्यार्थ्यांवर ताण वाढतो. पालकांनी मुलांच्या क्षमता आणि आवड लक्षात घेऊन त्यांना शिक्षण घेऊ द्यावे. चांगल्या मित्रांची संगत, संवाद आणि योग्य नियोजन हे यशासाठी महत्त्वाचे आहे.”

  1. “व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय ठेवावे,” असे आवाहन संजय शिंदे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकॅडमीचे संचालक अमित वर्पे यांनी केले. बाबाजी वर्पे, रेखा पवार, मयूर दरेकर आणि वैभव बोऱ्हाडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुवर्णा वाखारे व सोनाली दवंडे यांनी, तर आभार स्नेहल अमित वर्पे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button