विशेषशैक्षणिक

भारत येत्या काही वर्षात पुन्हा सुवर्ण भूमी होणार : डॉ. प्रा. दीपक गायकवाड

शिक्षक दिनानिमित्त प्राचार्य डॉ. के.सी. मोहिते, मुख्याध्यापिका अश्विनी दीपक घारू, शिक्षिका मनीषा दादाभाऊ चौधरी व शिक्षक दत्तात्रय बंडू शिंदे यांना प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार प्रदान

शिरूर, ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
संपत्ती निर्माण करणारी लोकसंख्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग असून समाजाशी भागीदारी करत विकासची प्रक्रिया गतीमान करावी असे सांगून भारत येत्या काही वर्षात पुन्हा सुवर्ण भूमी होणार असल्याचा विश्वास महात्मा फुले कृषी विद्यापीठा तील सेवानिवृत्त प्रा. दीपक गायकवाड यांनी व्यक्त केला.

प्राचार्य डॉ. के. सी.मोहिते यांना प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार प्रदान करताना मान्यवर

शिक्षक दिन व श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ ट्रस्ट शिरूर यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त डेक्कन स्कुल शिरूर येथे शिक्षकांच्या प्रेरणादायी शिक्षक हा पुरस्कार देवून विशेष सन्मान करण्यात आला.
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य व शास्त्रज्ञ डॉ. के.सी.मोहिते, रसिकलाल धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूलच्या

रसिकलाल धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल प्राचार्या अश्विनी
घारू यांना प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करताना
डेली न्यूज पोस्ट 24 च्या वतीने वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

मुख्याध्यापिका अश्विनी घारू, रयत शाळा न्यू इंग्लिश स्कूल येथील शिक्षक दत्तात्रय बंडू शिंदे, बीकेसी प्रीपायरी स्कूल मुक्ताईनगर येथील मनीषा चौधरी, या शिक्षकांच्या प्रेरणादायी शिक्षक हा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील अर्थशास्त्राचे सेवानिवृत्त प्रा. डॉ. दीपक गायकवाड, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, प्राचार्य डॉ. समीर ओंकार, , माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, माजी उपसरपंच गणेश खोले,ज्येष्ठ रंगकर्मी दीपक घारू, श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक काळे, रणजित गायकवाड, अमोल. काळे शरद परदेशी, सिंकदर मण्यार, शिवसेनेच्या नेत्या विजया टेमगिरे, मुख्याध्यापक विनायक म्हसवडे, गायक गणेश मराठे,आदी उपस्थित होते.

न्यू इंग्लिश स्कूल रयत शाळेतील शिक्षक दत्तात्रय बंडू शिंदे यांना प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार प्रदान करताना              यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले की समाजासाठी   तळमळ असणारे हलवाई चौक गणेश मंडळ असून रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विधायक व सामाजिक उपक्रम मंडळांनी राबवले आहेत.

 

बीकेसी प्री प्रायमरी स्कूल मधील शिक्षिका मनीषा दादाभाऊ चौधरी यांना प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करताना

आगामी काळ ज्ञानाचा व माहितीचा असणार असून ज्ञान हे मोती आहे. लोकसंख्या ही संपत्ती निर्माण करणारी असली पाहिजे. समाजाशी भागीदारी करून विकास करणे गरजेचे आहे.भारत विकासाचा मार्गावर असून भारत पुढील काही वर्षात पुन्हा सोन्याची भुमी होणार आहे.आनंदाची पातळी मोठी असणे हे समाधानाचे लक्षण आहे.निर्मितीचा आनंद हा सर्वोच्च असतो. आगामी काळ भारताचा आर्थिक वाढीचा काळ असल्याने वेगवेगळ्या क्षेत्रातील शिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावे. विविध कौशल्ये एकाच वेळी आत्मसात करा असा सल्ला गायकवाड यांनी दिला.

गटशिक्षणाधिकारी कळमकर म्हणाले की
शिक्षण हे परिवर्तनाचे साधन असून शिक्षण देण्याचे काम शिक्षक करतात.या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हलवाई चौक गणेश मंडळाचा उपक्रम कौतुकास्पद आहे.समाजाला दिशा देण्याचे काम शिक्षक करतात. एआयच्या जमान्यात ही शिक्षकाचे महत्व कायम राहणार आहेच.
प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते म्हणाले की शिक्षक हा विद्यार्थ्यांचा रोल मॉडेल असतात त्यामुळे शिक्षकांवर मोठी जबाबदारी असते. पहाटे लवकर उठा व व्यायाम करा व फिटनेस चांगला ठेवा. कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी फिटनेस महत्वाचा आहे .प्रत्येकाने आत्मशोध घेऊन आपल्यातील क्षमताचा विकास करावा. भारतातील विद्यार्थी जगभर काम करीत असून विविध क्षेत्रात मोठया संधी युवकांसमोर आहेत. झोकून देऊन काम करा.असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सतीश धुमाळ यांनी केले त्यांनी सांगितले की सामाजिक व विधायक उपक्रमांचे आयोजन हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचा वतीने वर्षभर केले जात असते. काही वर्षापूर्वी गणेश विसर्जन मिरवणूक साध्या पद्धतीने काढून त्या वाचलेल्या पैसातून मंडळाने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्याच बरोबर पर्यावरण संर्वधनसाठी वृक्षारोपण व झाडांचे वाटप, शालेय साहित्य वाटप, निराधारांना मदत, वाचन संस्कृती वाढीसाठी पुस्तकांचे वाटप असे विविध उपक्रम राबविले जातात. मंडळाचे यंदा उत्सवाचचे ५० वे वर्ष आहे. मंडळाने तीसहून अधिक शिक्षकांना शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
यावेळी स्वागत प्राचार्य समीर ओंकार यांनी केले.
मुख्याध्यापिका अश्विनी घारू यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शिक्षिका शितल ढवळे यांनी केले तर आभार अमोल काळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button