विशेष

व्हीआयपी मान्यवरांनी घेतले श्री. हलवाई गणेशाचे दर्शन .

हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचे उत्सवाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष

शिरूर ( डेली न्यूज पोस्ट टीम _२४)
येथील हलवाई चौक गणेश मंडळ ट्रस्टला अनेक व्हीआयपी मान्यवरांनी भेट देत हलवाई गणेशाचे दर्शन घेतले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांनी श्री हलवाई गणेशाचे दर्शन घेतले

येथील हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षं असून नवसाला पावणारा अशी हलवाई चौक गणेश मित्र मंडळाची ख्याती असुन चांदीचा गणपती म्हणून ओळखला जातो. शिरूर, श्रीगोदा, पारनेर सह पुणे जिल्हातून व शहरातुन गणेश भक्त दर्शनासाठी येत असतात.

प्रयागराज येथील आखाड्याचे प्रमुख महंत गंगाधर महाराज यांनी श्री हलवाई गणेशाचे दर्शन घेतले. मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी महंत गंगाधर यांची भेट महत्वाची ठरली

उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथील आखाडाचे महंत गंगाधर महाराज, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, आमदार माऊली कटके यांच्या पत्नी मनीषा कटके, ह. भ. प. सोपानमहाराज कन्हेरकर,

अभिनेता रमेश परदेशी व अभिनेत्री ऋतुजा शिरोडे श्री
हलवाई गणेशाची आरती करताना

चित्रपट अभिनेते पिट्या भाई उर्फ रमेश परदेशी, अभिनेत्री ऋतुजा शिरोडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल दादा बाबुराव पाचरणे, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आदी सह राजकीय सामाजिक व धार्मिक. क्षेत्रातील मान्यवरानी मंडळास भेट देऊन हलवाई गणेशाचे दर्शन घेतले.

आमदार माऊली कटके यांच्या पत्नी सौ मनीषा माऊली कटके
श्री हलवाई गणेशाची आरती करताना

त्याचबरोबर मंडळ्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास जैन धर्मगुरू गौतमजी महाराज यांनी भेट दिली होती.

डेली न्यूज पोस्ट 24 च्या वतीने वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button