Uncategorizedराष्ट्रीय
राजमाता जिजाऊ अभिवादन यात्रा मंगळवार दिनांक १६ जून रोजी सकाळी नऊ वाजता शिरूर मध्ये

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिवजन्मभूमी सिंदखेड राजा ते रायगड (पाचाड) अशी निघालेली ‘राजमाता जिजाऊ अभिवादन यात्रा’ मंगळवार (दि. १६ जून ) रोजी शिरूर शहरात दाखल होणार असून, यात्रेच्या स्वागतासाठी शिरूर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिरूर शहरातील हायवे सेंटर येथे सकाळी ९ वाजता या ऐतिहासिक यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी शिरूर शहरातील जिजाऊंच्या लेकींच्या हस्ते यात्रेचे जंगी स्वागत होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा जागर आणि इतिहासाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यात्रेच्या निमित्ताने शिवभक्त आणि जिजाऊ भक्तांना एकत्र येण्याची संधी
मिळणार असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेचे स्वागत करण्याचे आवाहन शिरूर शहर जिजाऊ भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्वागत सोहळ्याला तालुक्यातील शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
