Uncategorizedविशेषशैक्षणिक

ग्राममंगल बीकेसी सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल, मुक्ताईनगर येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा वार्षिक स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

oplus_131074
oplus_131090

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}ग्राममंगल बहुद्देशीय संस्थेच्या बीकेसी सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल, मुक्ताईनगर येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा वार्षिक स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. चिमुकल्यांच्या निरागस हास्याने, नृत्याच्या ठेक्यांनी आणि टाळ्यांच्या गजराने संपूर्ण शाळा परिसर भारावून गेला.

या स्नेहमेळाव्यास संस्थेचे अध्यक्ष सुनील चौधरी, सचिव मनीषा चौधरी, विश्वस्त राजू शेख, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, प्रसिद्ध बांधकाम व हॉटेल व्यावसायिक चंद्रकांत चोपडा, संदीप बिहाणी, कापड व्यवसायिक सुनील धाडीवाल, माजी सैनिक विकास जासूद, बाळासाहेब शेवाळे, सुप्रसिद्ध सूत्रसंचालक रावसाहेब चक्रे,ललिता पोळ,जयश्री खणसे वात्सल्य सिंधू संस्थेच्या उषा वाखारे, शिवसेनेच्या नेत्या विजया टेमगिरे, शिरूर मुद्रण संघटनेचे अध्यक्ष बाबुराव पाचंगे, प्राचार्य डॉ. समीर ओंकार, संतोष येवले, डॉ. नितीन घावटे, महेश सारडा, निलेश पिपाडा, अनुराधा रासकर, तृप्ती लामखडे, जालिंधर पवार ,यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली. त्यानंतर चिमुकल्या कलाकारांनी सादर केलेल्या “जय जय शिवशंकर”, “यमला पगला दिवाना”, “प्यार हुआ…”, “हवा हवाई”, “हम है राही प्यार के”, “झुबी झुबी” तसेच “आज आनंद आली बहार” या हिंदी व मराठी गीतांवरील नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक सादरीकरणानंतर टाळ्यांचा कडकडाट होत होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष सुनील उर्फ दादा चौधरी यांनी सांगितले की, “लवकरच शाळेत माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग सुरू करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कौशल्य विकासाचे विविध अभ्यासक्रमही राबविले जाणार आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच संस्थेचे अंतिम ध्येय आहे.” त्यांच्या या घोषणेला उपस्थितांनी दाद दिली.

कार्यक्रमाचे सुसूत्र व प्रभावी सूत्रसंचालन मनीषा चौधरी व रावसाहेब चक्रे यांनी केले.यावेळी प्रा. सतीश धुमाळ, प्राचार्य डॉ. समीर ओंकार, संतोष येवले, बाबुराव पाचंगे आदीची भाषणे झाली.स्नेहमेळाव्याने विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, संस्कार आणि कलागुण अधिकच बहरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

एकूणच हा स्नेहमेळावा म्हणजे शिक्षण, संस्कृती आणि भावनांचा सुंदर संगम ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button