Uncategorized

कस्तुरी शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ लॉच्या विद्यार्थ्यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहास शैक्षणिक

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}कस्तुरी शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ लॉच्या विद्यार्थ्यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहास शैक्षणिक भेट देत कारागृह प्रशासन, कार्यपद्धती आणि कैद्यांच्या कायदेशीर अधिकारांची प्रत्यक्ष माहिती घेतली. कायद्याच्या अभ्यासातील सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहाराशी संबंध समजून घेण्याच्या दृष्टीने ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरली.

भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी कारागृहातील विविध विभागांची पाहणी केली. कैद्यांना उपलब्ध मूलभूत सुविधा, कायदेशीर मदत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणारी न्यायालयीन प्रक्रिया, कैद्यांचे अधिकार तसेच पुनर्वसन प्रक्रियेबाबत अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. कारागृह प्रशासनासमोरील व्यावहारिक आव्हाने आणि न्यायव्यवस्थेशी असलेला समन्वय याबाबतही विद्यार्थ्यांनी माहिती घेतली.

विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत कारागृह व्यवस्था, कायदेशीर मदत आणि कैद्यांच्या पुनर्वसनासंदर्भात विविध प्रश्न विचारले. येरवडा कारागृहाच्या ऐतिहासिक महत्त्वाचीही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित मोतीलाल नेहरू यांना ब्रिटिश काळात येथे बंदिवासात ठेवण्यात आले होते. त्यांच्या बंदिवासातील खोल्या आजही जतन करण्यात आल्या आहेत. तसेच पुणे कराराशी संबंधित ऐतिहासिक स्थळाची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कस्तुरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. जयश्री पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट आयोजित करण्यात आली. स्कूल ऑफ लॉच्या प्रा. डॉ. उज्ज्वला साखळकर, प्रा. सुप्रिया खांडे आणि प्रा. सुयश हांडे यांनी विद्यार्थ्यांसोबत सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button