Uncategorized
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24} नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात विविध विकासकामे मार्गी लावत सर्वसामान्यांशी बांधिलकी जपणारे आणि जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून माजी नगराध्यक्ष गुलाब शेठ धाडीवाल यांची ओळख आहे. सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध जपत त्यांनी अजातशत्रू म्हणून व्यक्तिमत्त्व निर्माण केले आहे,
अशा भावना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात मान्यवरांनी व्यक्त केल्या.
गुलाब शेठ धाडीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी संघपती भरत चोरडिया, राहुल बोथरा, कांतीलाल बोथरा, प्रितेश कोठारी, अजित दुगड, विशाल जोशी, संतोष गवळी, चंद्रकांत घावटे, सदानंद लांडे ,लक्ष्मण धोत्रे, यांच्यासह
राहुल काळे स्वप्ननील भंडारी, माजी सभापती संतोष शितोळे, तुकाराम खोले आणि गोपीनाथ पठारे आदींनी धाडीवाल यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.






