Uncategorized
क्रीडेतून व्यक्तिमत्त्व विकास; विद्यार्थ्यांनी कला-क्रीडेकडेही लक्ष द्यावे


क्रीडेमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पुणे विभागीय संचालक डॉ. व्ही.. बी.गायकवाड यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन डॉ. गायकवाड यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, उपप्राचार्य हरिदास जाधव, अभ्यास केंद्राचे मार्गदर्शक प्रा. चंद्रकांत धापटे, केंद्र संयोजक डॉ. अंबादास केत, क्रीडा विभागाचे बोबडे, डॉ. अप्पासाहेब चव्हाण, संतोष वामन, प्रदीप गायकवाड, यश धनगर, आरोग्य केंद्राचे डॉ. नरसिंग शिरसाठ, सत्यजित चिमटे, केंद्र सहाय्यक निळोबा भोगावडे, प्रा. रतनकुमार ससाणे, अनिल पांढरमिसे आदी उपस्थित होते.



