शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24} घोडनदी (ता. शिरूर) येथील जैन समाजाचे ज्येष्ठ श्रावक आणि श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचे शांतिलालजी जेठमलजी मुथा (वय ८९) यांचे संथाराव्रतादरम्यान शनिवारी (ता. १७) संथारा व्रताची सांगता झाली . त्यांनी बुधवारी (ता. १४) जैन धर्मातील संथाराव्रताचे प्रत्याख्यान घेतले होते. चार दिवसांच्या या आध्यात्मिक प्रवासात त्यांनी आपला तिसरा मनोरथ पूर्ण केला.
घोडनदी येथे विराजमान असलेल्या प. पू. साध्वी आभाश्रीजी म. सा. आणि प. पू. डॉ. महिमाश्रीजी म. सा. यांच्या मुखारविंदातून शांतिलालजी यांनी सजग अवस्थेत संथाराव्रत स्वीकारले होते. जैन धर्मात संथारा हे जीवनाच्या अंतिम टप्प्यात आध्यात्मिक साधना, आत्मसंयम आणि समर्पणभावनेतून स्वीकारले जाणारे व्रत मानले जाते.
शांतिलालजी मुथा हे जैन समाजातील ज्येष्ठ श्रावक होते. प्रसिद्ध व्यवसायिक नवनीत मुथा यांचे ते बंधू, तर व्यवसायिक राजेंद्र (बाळू) आणि जितेंद्र यांचे ते वडील होते. धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे मोठे योगदान होते. श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचे ते सल्लागार होते.
त्याची अंतिम डोल यात्रा
शनिवारी दुपारी ३ वाजता हलवाई चौक येथील निवासस्थानातून घोडनदी येथील गोरक्षण पांजरापोळ येथे नेण्यात येणार असल्याची माहिती जैन श्रावक संघ आणि मुथा परिवाराच्या वतीने देण्यात आली.