शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूर येथील घावटे मळा येथील ज्येष्ठ नागरिक धोंडीबा मारुती घावटे (वय १००) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. परिसरातील धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिरूर रामलिंगचे माजी उपसरपंच व जयजवान खडी क्रशरचे नामदेवराव घावटे, महादेव घावटे आणि पोलीस अधिकारी गंगाधर घावटे यांचे ते वडील होत. तसेच शांताबाई गजानन झरेकर, प्रमिला नानासाहेब झरेकर व छाया संभाजी शिंदे यांचेही ते वडील होते.
**अंत्यविधी आज, शनिवार (दि. १७ ऑक्टोबर) रोजी सकाळी १० वाजता घावटे मळा येथील त्यांच्या राहत्या घरी होणार आहे.**