स्नॅपचॅट वरून विद्यार्थिनीला अश्लील फोटो पाठवून धमकी; शिरूरमध्ये गुन्हा दाखल
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम-24} स्नॅपचॅट
अकाउंटवरून १८ वर्षीय विद्यार्थिनीला अश्लील फोटो पाठवून तिच्याकडील खासगी फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘vishalkhatpe26’ या स्नॅपचॅट अकाउंटवरून १ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १० वाजता विद्यार्थिनीच्या अकाउंटवर अश्लील स्वरूपाचा फोटो पाठविण्यात आला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने विद्यार्थिनीचे फोटो आपल्याकडे असल्याचे सांगत ते व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच खासगी फोटो व व्हिडिओ पाठविण्याची मागणी केली.
यापुढे भेटण्यासाठी येण्याचा दबाव टाकत, भेट न दिल्यास पाठविलेले व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड करण्याची धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी गु.र.नं. ८७१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ७८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘vishalkhatpe26’ हे अकाउंट चालविणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा शोध घेण्यात येत असून, पुढील तपास पोहवा/११९१ आगलावे करीत आहेत.




